* 📌 प्रस्तुती : साहित्य उत्सव * प्रायश्चित्त * * ❇️ भाग - २ * ♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️ *_ शाल्मली भराभर आवरत होती . एकीकडे दिवसभर ऑफिसमधे होणाऱ्या मिटींग्ज , त्यासाठीची तिची झालेली , राहीलेली तयारी , यांची मनातल्या मनात उजळणी सुरू होती , तर दुसरीकडे हात स्वैपाकघरात अत्यंत सराईतपणे चालत होते ._* *_ दोन दिवसांच्या श्रीश ला घेऊन , वर्षभरापूर्वी शंतनू ला कायमचं सोडून जेव्हा ती आईबाबांबरोबर निघाली तेव्हा मनात प्रचंड काहूर होतं . भविष्यात काय लिहून ठेवलंय याचा अंदाज नव्हता . पदरी श्रुती नसलेलं दोन दिवसाचं बाळ , ना नोकरी ना पैसा ._* *_ आईवडिलांचा आधार काही काळापुरताच घ्यायचा हे मात्र तिने तेव्हाही ठामपणे ठरवलं होतं . नाही म्हणायला शिक्षण मात्र होतं , उत्तम मार्कांची डिग्री होती . पण नोकरी मिळेल ? राहायचं कुठे ?_* *_ आईवडिल , भाऊवहिनी , त्याची दोन मुलं यांना त्यांची जागा पुरत होती . पण आणखी दोन माणसं कायमची राहायची तर जरा अडचण होणार हे नक्की होतं . पण ...
This website provide information regarding things that come in my mind